१० घरगुती टिप्स:घर टापटीप/नीटनेटके ठेवण्यासाठी 10 tips to maintain your home in marathi

   10 tips to maintain your home

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

                                                       
10 tips to maintain your home in marathi
10 tips to maintain your home in marathi

नीटनेटके आणि स्वच्छ घर राखल्याने एक स्वागतार्ह आणि शांत वातावरण निर्माण होते. नियमित स्वच्छता ही गोंधळ कमी करण्यास,  तणाव कमी करण्यास मदत करते. साफसफाईसाठी वेळ समर्पित करून आणि प्रभावी साफसफाईची दिनचर्या अवलंबून, तुम्ही एकूणच आरोग्यास समर्थन देणारी जागा तयार करू शकता.

10 tips to maintain your home in marathi

घर नीटनेटके ठेवण्यासाठी खालील टिप्सची तुम्हाला मदत होईल:

 1. कपडे खरेदी करताना एक कपडा घेतला तर आधीचा जुना नको असलेला, भविष्यात कधीतरी वापरू असा विचार करून ठेवलेला एक कपडा कपाटातून काढून टाका. डोनेट करा.  असे करणे जास्तीत जास्त वापरास प्रोत्साहन देते आणि वस्तूंचा अनावश्यक संचय कमी करते. जेव्हा तुम्ही आधीची वस्तू डिसकार्ड करता तेव्हाच नवीन वस्तू खरेदी करून, तुमचे पैसे वाचवू शकता आणि तुम्ही तुमच्या राहण्याच्या जागेत आणलेल्या गोष्टींबद्दल अधिक जाणूनबुजून निवड करू शकता.

2. कपाट नेहमी व्यवस्थित लावून ठेवा म्हणजे सगळे कपडे दिसतील, वापरलेही जातील. आपण समोर दिसणारे कपडेच वापरण्याचा प्रयत्न करतो. (आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड)

3. घरात बास्केट अथवा बॉक्सेसचा वापर करा. वस्तु ऑर्गनाइज करायला त्यांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, फ्रिजमध्ये, कपाटात, औषधे ठेवण्यासाठी, सौंदर्यप्रसाधने ठेवण्यासाठी, सणासुदीला लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी, पूजा सामान ठेवण्यासाठी, मुलांची खेळणी ठेवण्यासाठी इत्यादी. '10 tips to maintain your home in marathi'

4. घरात आल्यावर दरवाज्यापाशी  एक बास्केट ठेवा. त्यात चावी, पाकिट, आईकार्ड, घड्याळे, कॅप्स, चष्मा इत्यादी ठेवायला त्याचा उपयोग होतो. वस्तू सहज मिळण्याजोग्या ठेवा म्हणजे नंतर घाई, गडबड होणार नाही.

tips to maintain your home.

5. वस्तु काढल्यावर ती जागच्या जागी ठेवण्याची घरातल्या सर्वाना सवय लावा. प्रत्येकाने आनंद घेण्यासाठी नीटनेटके आणि व्यवस्थित राहण्याच्या प्रयत्न करणे. हा सराव वेळ वाचवण्यास मदत करतो आणि गोंधळ कमी करते, आवश्यकतेनुसार वस्तू शोधणे सोपे करते.

6. नको असलेल्या गोष्टी वेळोवेळी डिस्कार्ड अथवा डोनेट करण्याचा प्रयत्न करा. ही सवय डिक्लटरिंगला प्रोत्साहन देते, अनावश्यक संचय कमी करते 

7. कमीत कमी गरजा ठेवा म्हणजे वस्तूंची खरेदीही कमी होईल. शाश्वत आणि किफायतशीर जीवनशैलीकडे लक्ष देणे. हव्यासावर भर देण्यापेक्षा मूलभूत गरजांवर भर  देऊन नवीन वस्तू घेण्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

8. कागदी पिशव्या सुक्या कचऱ्यासाठी तर किराणा मालबरोबर आलेल्या प्लास्टिक पिशव्या ओल्या कचऱ्यासाठी वापरा. 10 tips to maintain your home in marathi  प्रभावी कचरा व्यवस्थापनासाठी सुका आणि ओला कचरा यात फरक करणे महत्त्वाचे आहे. कचऱ्याचे विलगीकरण केल्याने योग्य रिसायकलिंग, कंपोस्टिंग आणि विल्हेवाट लावणे शक्य होते, ज्यामुळे स्वच्छ आणि अधिक टिकाऊ वातावरणात हातभार लागतो.

9. जुन्या चादरी, जुने कपडे स्वयंपाकघरात साफसफाईसाठी वापरू शकता.

10. उशांची/ कुशनची कव्हर्स यांचा वापर चांगले कपडे ठेवण्यासाठी (उदाहरणार्थ साडय़ा, सदरे-झब्बे, महागडे ड्रेसेस इ) करू शकता.

 tips to maintain your home

  • ऑर्गनाइज घर आपल्याला नेहमी अधिक कार्यक्षम बनवते.   
  •  सर्व गोष्टींचे वर्गीकरण करा. प्रथम कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी इत्यादी वस्तू समोर एकत्रित ठेवा. त्यातल्या  तुटलेल्या, वापरात नसलेल्या, गरज नसलेल्या वस्तू बाजूला काढा व गरजेपुरता वस्तु परत व्यवस्थित लावून ठेवा. 
  •  डिक्लटर. वापरात नसलेल्या, नको असलेल्या वस्तू गरजवंतास दान करा अथवा विकून टाका. 
  •  वस्तू लावून ठेवण्यासाठी बास्केट, डबे, उभे शेल्व्हस इत्यादि ऑर्गनाइजर्सची तुम्हाला मदत होईल.  
  • डबे, बरण्या इत्यादींना लेबल करा जेणेकरून तुम्हाला कुठली वस्तू कुठल्या ठिकाणी आहे ते सहज समजेल. ती परत त्याच ठिकाणी ठेवण्यासही मदत होईल. वस्तू जागच्या जागी ठेवण्यास हि गोष्ट प्रोत्साहित करेल.
  •  साफसफाईचे रूटीन सेट करा. या वेळापत्रकानुसार कार्यशील राहून आपण स्वच्छता करू शकतो. छोट्या, आटोपशीर भागांमध्ये कामांचे नियोजन करा.
  •  बिले, पावत्या, महत्वाची कागदपत्रे व्यवस्थित लावून ठेवा. ढीग करून ठेवण्यापेक्षा ती वेळोवेळी जागच्या जागी फाइल्समध्ये, फोल्ड़रमध्ये लावून ठेवण्याची सवय लावून घ्या. 
  •  स्टोरेज साठी उभ्या जागेचा वापर करा. यामुळे साठवण्याची क्षमता वाढेल(स्टोरेज स्पेस)८. प्रत्येक वस्तुची आपली एक जागा निश्चित करा. घरातही सर्वाना सूचित करा कि एका विशिष्ट ठिकाणीच ती वस्तू परत ठेवली गेली पाहिजे.
  •  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. उदा. डिजिटल फाइल्स वापरा. संगणकावर फाइल्स सेव्ह करा.
  •  गरजा मर्यादित ठेवा. वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती खरोखर गरजेची आहे का हे तपासा. गुणवत्तेला प्राधान्य द्या.

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या पद्धतींचा समावेश करा. घराची देखभाल ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे सातत्य आणि तपशीलाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, एक नीटनेटके आणि स्वच्छ घर राखणे हे फक्त एक कामच नाही तर  ही तुमच्या एकंदर कल्याणासाठी केलेली गुंतवणूक आहे. तुमची राहण्याची जागा व्यवस्थित आणि नीटनेटकी ठेवून तुम्ही एक शांत आणि सामंजस्यपूर्ण वातावरण तयार करता जे उत्पादकतेला प्रोत्साहन देते, तणाव कमी करते आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. "10 tips to maintain your home in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

pravasachi purvtayariप्रवासाची पूर्वतयारी travel preparation in marathi

स्वतःची काळजी घ्या self-care in marathi

घर कसे स्वच्छ करावेhow to clean home step by step in marathi