जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi

 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi
10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi

10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे उपयोग:

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.ना टाकून देण्याऐवजी, तुमच्या घरामध्ये आणि दैनंदिन जीवनात मूल्य वाढवणारे विविध सर्जनशील उपयोग शोधण्याचा विचार करा. '10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi'

१. काचेची भांडी साफ करताना सिंकमध्ये जुने कापड आपण घालू शकतो म्हणजे भांडी फुटण्याचा धोका कमी होतो. 

२. काचेची भांडी धुतल्यानंतर ती सुकवण्यासाठी ओट्यावर हे कापड घालू शकतो.

10 uses of old bedsheet

३. चपाती करताना पोळपाटाखाली जुने कापड घ्यावें म्हणजे पोळपाट सरकत नाही व चपाती लाटताना पीठ पडून ओटा खराबही होत नाही. 

४. कडधान्यांना मोड काढण्यासाठी ती या कापडात बांधून ठेवावीत.

५. धूतलेल्या पालेभाज्या, धुतलेले धान्य वाळवण्यासाठी जुन्या कपडय़ांचा वापर करू शकतो. 

10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi

६. साफसफाईच्या कामांसाठीही या कपडय़ांचा वापर होऊ शकतो.(तेल,तूप,अंडे इ.पदार्थांची सांड-लवंड झाल्यास लगेचच जुने कापडाचे तुकडे घेऊन ते स्वच्छ करून फेकून द्यावेत. फर्निचर, विद्युत उपकरणे इ.साफ करण्यासाठी जुने कपडे वापरू शकतो.) शिवून पायपुसणी बनवू शकतो.

७. जुन्या चादरीला फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कव्हर म्हणून वापरा.  

10 uses of old bedsheet

८. चपातीच्या डब्यात खाली घालायला रोटी मॅट्स बनवू शकतो.

९. महागड्या कपड्याचे सेट्स(साड्या,ड्रेसेस) उशीच्या कव्हर मध्ये ठेऊ शकतो. अगदी प्रवासाच्या आवश्यक गोष्टींसाठी स्टोरेज पाउच म्हणून वापर करू शकता.

१०. लहान मुलांना गोधड्या शिवू शकतो. पाळीव प्राण्यांचे बेड, क्रेट कव्हर्स बनवू शकतो किंवा अगदी हाताने बनवलेल्या खेळण्यांमध्ये फॅब्रिक कापून शिवू शकतो.

जुनी उशांची कव्हर्स आणि जुन्या बेडशीट पुन्हा वापरून, तुम्ही केवळ कचरा कमी करत नाही आणि पैशांची बचत करत नाही तर तुमची सर्जनशीलता (creativity)देखील दाखवता. तुम्ही कल्पकता वापरून अजूनही नवनवीन उपयोग करू शकता. अशाप्रकारे, तुमचे घर व्यवस्थित ठेवताना तुम्ही या वस्तूंना दुसरे जीवन द्या.

"10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

pravasachi purvtayariप्रवासाची पूर्वतयारी travel preparation in marathi

स्वतःची काळजी घ्या self-care in marathi

घर कसे स्वच्छ करावेhow to clean home step by step in marathi