कोकण ओळख kokani mewa kokan oolakh
kokani mewa kokan oolakh आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! kokani mewa kokan oolakh kokani mewa kokan oolakh कोकण ओळख अरबी समुद्र व सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली परशुरामाची भूमी/ देव भूमी म्हणजेच कोकण. निसर्गाने बहाल केलेली समृद्धी पाहायची असेल तर कोकणला पर्याय नाही. वेगवेगळ्या ऋतूत कोकणाचे सौंदर्य न्याहाळणे अप्रतिम वाटते. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे विभाग कोकणात येतात. देवळे, बंदरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळ,सुपारीच्या बागा,केळीच्या बागा, किल्ले इ.चा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच कोकणाकडे वळतात. तारकर्ली, देवबाग, गणपतीपुळे, मालवण, दापोली, वेंगुर्ला, गुहागर, मुरुड, अलिबाग, विविध बंदरे, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, देवगड, सिंधुदुर्ग किल्ला, रत्नदुर्ग किल्ला इ. कोकणातील पर्यटन स्थळे आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटक कोकणाला पसंती देतात. पर्यटनाला वॉटर स्पोर्ट्स मुळे चालना मिळाली आहे. तेथे राहण्यासाठी हॉटेल्स, होमस्टेज इ.पर्याय उपलब्ध आहेत. 'kokani mewa kokan oolakh' kokani mewa कोकणातील खाद्य संस्कृती:...