तृणधान्ये millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi

 millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 


millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi
 millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi

 millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi

तृणधान्ये millets

 संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष 'इंटरनॅशनल मिलेट इयर' घोषित केले आहे.

मिलेट अर्थांत एकदल धान्ये/तृणधान्ये.

शारीरिक आरोग्यास/ वाढीस आवश्यक असलेले घटक तृणधान्यात असतात.

यात कर्बोदके अधिक प्रमाणात असतात.

ही धान्ये पौष्टिक व पचनास हलकी असतात.

गहू, तांदूळ या धान्यांना पर्याय म्हणून आपण तृणधान्य वापरू शकतो.

यात ज्वारी, बाजरी, नाचणी, कुट्टू, मका, राळे, राजगीरा, वरई,साबुदाणा, सातू,ओट्स,

इत्यादी धान्ये येतात. 

या धान्यांपासून आपण भाकरी, थालीपीठे, धिरडी, घावणे, पुऱ्या, पराठे,लाडू, खिचडी, डोसा, उत्तप्पा इत्यादि पदार्थ बनवू शकतो.   'millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi'

nachni ladu

नाचणी लाडू

साहित्य:

  • १ कप नाचणी पीठ 
  • २ चमचे तूप
  • १/२ छोटा चमचा वेलची पूड
  • १ चमचा तीळ१/२ कप गूळ पावडर                   

 कृती:

प्रथम एका कढईत तूप घालून त्यावर नाचणी पीठ खरपूस भाजून घ्यावे. थंड झाल्यावर एका ताटात काढून त्यात गूळ पावडर, वेलची पूड, तीळ घालून एकत्र करावे. सर्व साहित्य मिक्सरमधूनही एकदा थोडेसे फिरवून घेऊ शकता. मग त्याचे लाडू वळावेत. मिश्रण सुके वाटत असल्यास त्यात १ चमचा तूप वितळवून घालणे व लाडू वळणे.

 jwari dosa

ज्वारी डोसा

साहित्य:

  • १ कप ज्वारीचे पीठ
  • ३ कप पाणी
  • १/२ कांदा
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ बारीक कापलेल्या मिरच्या
  • मीठ स्वादानुसार
  • तेल

कृती:

एका टोपात ज्वारीचे पीठ घेऊन त्यात पाणी घालणे. नंतर त्यात मीठ, कांदा, कोथिंबीर, मिरच्या घालणे. मिश्रण ढवळून घेणे. १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवणे. १५ मिनिटांनंतर गरम तव्यावर डोसे करून घेणे. डोसे करताना मिश्रणाची consistency तपासून घेणे. डोसे चटणीबरोबर सर्व्ह करणे.  millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi

 bajri khichdi

बाजरी खिचडी

साहित्य:

  • १ कप बाजरी
  • १/२ कप मूग डाळ
  • १ चमचा तूप
  • १/२ चमचा जिरे
  • १/४ चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • ३ कप पाणी
  • मीठ

कृती:

रात्री बाजरी पाण्यात भिजत घाला. सकाळी त्यातले पाणी काढून टाका. मुगडाळ धुवून घ्या. कूकरमध्ये बाजरी व मुगडाळ मीठ व पाणी घालून शिजवून घ्या. ४-५ शिट्या करा. एका पातेल्यात तूप घालून त्यात जिरे, हळद, हिंगाची फोडणी द्या. नंतर त्यामध्ये कूकरमधले बाजरी-मूगडाळीचे मिश्रण घाला. सर्व ढवळून खिचडी ५ मिनिटे शिजू द्या. पौष्टिक खिचडी तयार!    "millets recipe in marathi nachni ladu, jwari dosa, bajri khichdi"

Next Blog





Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

लोक आता सामाजिक का नाहीत? सोशल कोशंट का कमी होत आहे? Why Social Quotient Is Less?

सोशल मीडियावर शो ऑफचा उदय - सकारात्मक की नकारात्मक social media show off positive or negative