बटाट्याची भाजी, लाल चटणी, हिरवी चटणी batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi
batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi
आमच्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे जिथे आम्ही डोस्यासोबत दिली जाणारी बटाटा भाजी व चवदार चटणी ही तोंडाला पाणी आणणारी रेसिपी शेअर करणार आहोत.
Batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi
बटाट्याची भाजी, लाल चटणी, हिरवी चटणीबटाट्याची भाजी
साहित्य:
४-५ मध्यम आकाराचे बटाटे
१ कांदा
२ मिरच्या
१/२ इंच आल्याचा तुकडा
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा राई
१/२ चमचा उडीद डाळ
१/४ चमचा हळद
चिमूटभर हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने
२ चमचे तेल
मीठ स्वादानुसार
कृती:
कुकर मध्ये ४ शिट्या करून बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर साले काढून मॅश करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरं, हिंग, हळद, मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्या. उडीद डाळ टाका. कांदा घालून परता. नंतर त्यात किसलेले आले घाला. नंतर बटाटे व मीठ घालून एकत्र करा. भाजी परतून घ्या. वरून कोथिंबीर घाला. गरमागरम बटाट्याची भाजी तयार! 'batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi'
लाल चटणी
red chutney
साहित्य:
५-६ लसूण पाकळ्या
३ सुक्या संकेश्वरी मिरच्या
१/२ इंच आले
१/२ कप सुके खोबरे
१ चमचा तीळ
१ चमचा लिंबू रस
स्वादानुसार मीठ
फोडणीसाठी:
१/२ चमचा राई
चिमूटभर हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने,
कृती:
सर्व साहित्य थोडेसे पाणी घालून एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. वरून राई, हिंग व कडीपत्त्याची फोडणी देणे. चटणी तयार! batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi
हिरवी चटणी
Green chutney
साहित्य:
२ मिरच्या
१ वाटी ओले खोबरे
२ चमचे चिवडा डाळ
१/२ इंच आले
३-४ लसूण पाकळ्या
१ चमचा लिंबाचा रस
थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना
स्वादानुसार मीठ
पाणी
फोडणीसाठी:
१/२ चमचा राई
१/२ चमचा उडीद डाळ
चिमूटभर हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने,
कृती:
सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून वाटून घेणे. चटणी एका भांड्यात काढून ठेवणे.कढल्यात फोडणी करून घेणे व चटणीवर ओतणे. हिरवी चटणी तयार!
तुमच्या नाश्त्याची चव वाढवण्यासाठी ही सोपी रेसिपी बनवून पहा. "batata (aloo)bhaji, red chutney, green chutney recipe in marathi"
Comments
Post a Comment