टीनएज/किशोरावस्थेत मुलांशी कसे वागावे?मुलांना स्वयंपाक कसा शिकवावा? how to handle teenagers? teach children how to cook


 how to handle teenagers? in marathi teenage mule
आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 


how to handle teenagers? in marathi teenage mule
 how to handle teenagers? in marathi teenage mule

 How to handle teenagers? in marathi teenage mule

टीनएज/किशोरावस्थेत मुलांशी कसे वागावे?
किशोरवयीन मुलांशी व्यवहार करणे कधीकधी आव्हानात्मक असू शकते, परंतु समजूतदारपणा, संयम आणि प्रभावी संवादाने, आपण त्यांच्या विकासाच्या या टप्प्यावर यशस्वीरित्या नेव्हिगेट करू शकता.

१. मुलांचे म्हणणे ऐकून घ्या.

मुलांना आपले कोणीतरी ऐकून घ्यावे असे वाटते. आपले प्रश्न, आपली मते त्यांना मांडू द्या. त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या. सक्रियपणे ऐका आणि त्यांच्या भावना त्यांना मांडू द्या, जरी तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल तरी त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करून संभाषण करा.

२. मुलांना स्वतंत्रपणे जगू द्या. 

सल्ला नक्की द्या पण त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. त्या निर्णयाची जबाबदारीसुद्धा त्यांना घ्यायला सांगा. मार्गदर्शन  करताना आणि सीमा निश्चित करताना त्यांना निवडी आणि निर्णय घेण्याची परवानगी देऊन त्यांच्या स्वायत्ततेला प्रोत्साहन द्या.  'how to handle teenagers? in marathi teenage mule'

 teenage mule

३. मुलांना प्रेम आणि आधार घ्या.

कोणत्याही परिस्थितीत आपण पालक म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत हे त्यांना जाणवू द्या, आपल्याला त्यांची काळजी आहे, आपले  त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना कळू द्या. त्यांना नियमित योग्य मार्गदर्शन करा. मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची परवानगी द्या. त्यांच्या आवडी आणि आवडींना प्रोत्साहन द्या आणि त्यांना ध्येय निश्चित करण्यात आणि उद्देशाची भावना विकसित करण्यात मदत करा. किशोरवयीनांना भावनिक चढ-उतारांचा अनुभव येऊ शकतो हे ओळखा. कठीण काळात सहानुभूतीशील रहा, धीर धरा आणि आधार द्या.

४. सकारात्मक राहा. 

मुले आपल्याकडे बघून शिकतात म्हणून आपणाच त्यांचे रोल मॉडेल व्हायला हवे. आपण चांगल्या गोष्टी करून त्यांच्यासमोर आदर्श ठेवायला हवा. त्यांच्याशी आणि इतरांशी तुमच्या परस्परसंवादात आदर, दयाळूपणा आणि चांगले संवाद कौशल्य दाखवा. याचा त्यांच्या स्वतःच्या वर्तनावर आणि निवडींवर लक्षणीय परिणाम होईल.

५. संयम बाळगा.

कधी कधी मुलांचे वागणे आपल्याला पटत नाही, ती अशी का वागतात हे कळेनासे होते. पण मुलांची ही किशोरावस्था आहे. या आव्हानात्मक काळात आपण संयम राखणे गरजेचे आहे. मुलांना गोष्टीरूपाने, उदाहरण देऊन समजावून सागा.  

६. मुलांवर वयाप्रमाणे जबाबदारी सोपवा पण मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका.ती स्प्रिंगसारखी अजून उफाळून येतील. आपली वैयक्तिक मते मुलांवर लादू नका. 

मुलांना स्वयंपाक कसा शिकवावा?

मुलांना कसे शिकवावे? 

१. प्रथम त्यांना स्वयंपाकाच्या विविध पद्धती समजावून सांगणे जसे की भाजणे, तळणे, चिरणे, उकडणे, उकळवणे इत्यादि. 

२. मुलांना विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, भाज्या, मसाले इत्यादी जिन्नस दाखवून त्यांची नावे सांगणे.

३. त्यांना छोटी-छोटी कामे करायला सांगणे. उदा. 

  • डब्यात काहीतरी भरून ठेवायला सांगा. 
  • फळे, भाज्या धुवायला सांगा.
  • भाज्या मॅश करायला सांगा. 
  • मिश्रण करायला सांगा/ढवळायला सांगा. 
  • धुवून सुकवलेली भांडी ट्रॉलीमध्ये लावायला सांगा.
  • किचनमधली छोटी-छोटी साफसफाई करायला सांगा. 
  • स्वयंपाकघरातील संभाव्य धोके लक्षात घेता कोणती काळजी घ्यायची ते सांगा.
  • चाकू, सुरी कशी काळजीपूर्वक हाताळावी  ते शिकवा.
  • सांड-लवंड झाल्यास ती लगेचच कशी साफ करायची ते शिकवा.
  • किसणीवर सुके खोबरे किसायला लावा.
  • पनीरचे क्युब करायला सांगा.
  • स्वयंपाकघरातील विविध अप्लायन्सेस हाताळायला लावा.(मिक्सर, टोस्टर, ओव्हन इ.)
  • त्यांना सलाड, स्मूदी करायला शिकवा.  
  • साध्या सोप्या पाककृती करायला लावा जसे की कोशिंबिरी, सॅन्डविचेस, चहा, कॉफी इत्यादि. 
  • भाताचा कुकर लावायला सांगा. 
  • पीठ भिजवायला सांगा. how to handle teenagers? in marathi teenage mule

how to handle teenagers?

  • स्वयंपाकघरात हसत्या-खेळत्या वातावरणात मुलांना शिकू द्या.
  • त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांचे कौतुक करा जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. 
  • एकदा का त्यांचा आत्मविश्वास वाढला की ते स्वतःहून पुढाकार घेऊन वेगवेगळ्या पाककृती बनवायला लागतील.

मुलांना स्वयंपाक शिकवणे हा एक वेगळा अनुभव असू शकतो. हे केवळ त्यांना जीवनावश्यक कौशल्यांनी सुसज्ज करत नाही तर सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि अन्नाशी निरोगी नातेसंबंध देखील वाढवते.  धीर धरून आणि सहाय्यक राहून, तुम्ही तुमच्या मुलांना स्वयंपाकाची आजीवन आवड निर्माण करण्यात आणि त्यांना स्वयंपाकघरात मजबूत पाया प्रदान करण्यात मदत करू शकता.   "how to handle teenagers? in marathi teenage mule"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi