आंबोळी/साधा डोसा/मसाला डोसा/तिखट आप्पे/गोड आप्पे/इडली aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi
aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi
aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi |
aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi
Aamboli
साहित्य:
- १ वाटी उडीद डाळ
- २ १/२ वाट्या तांदूळ
- १/२ चमचा मेथी दाणे
- पाणी
- मीठ
- तेल 'aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi'
कृती:
प्रथम एका टोपात उडीद डाळ स्वच्छ धुवून भिजत घालणे. दुसऱ्या टोपात तांदूळही २-३ पाण्यात धुवून भिजत घालणे. एका वाटीत मेथी भिजत घालणे. पीठ यायला(फेरमेंटेशन) मेथीमुळे मदत होईल. ३ तासांनंतर सर्व परत धुवून घेऊन थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. एका मोठ्या टोपात मिश्रण काढून घेणे. त्यात मीठ व पाणी घालून पीठ ७-८ तासासाठी ठेऊन देणे. ७-८ तासानंतर पीठ फुगून आलेले दिसेल.पिठाची pouring consistency हवी. गरम, नॉन स्टिक तव्यावर/बिड्यावर १/२ पेला पीठ गोलाकार पसरवून ६ सेमी.व्यासाची आंबोळी करून घेणे. आंबोळी दोन्ही बाजुंनी थोडेसे तेल लावून भाजून घेणे.चटणीबरोबर खाण्यास आंबोळी तयार!
उत्तप्पा
वरील पिठाचे आपण उत्तप्पेही करू शकतो.
१ कांदा, १/२ टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, १/२ चमचा लाल मसाला, १/४ चमचा हळद, स्वादानुसार मीठ घालून मिश्रण तयार करणे. पीठ तव्यावर घातले की वरून हे मिश्रण घालणे. दोन्ही बाजुंनी थोडे तेल सोडून उत्तप्पा भाजून घेणे. चटणीबरोबर सर्व्ह करणे.
sada dosa
साधा डोसा
वरील पिठाचे आपण साधे डोसेही करू शकतो. फक्त डोसे करताना पिठात पाणी थोडे जास्त घालावे. तव्यावर डोसा घालण्याआधी थोडे पाणी शिंपडावे व तवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. त्यामुळे डोसे तव्याला चिकटत नाहीत व कुरकुरीत होतात.
masala dosa
मसाला डोसा
मसाला डोसा करताना डोसा तव्यावर असताना त्यावर बटाट्याची भाजी पसरवावी व थोडे तेल/लोणी सोडावे. चटणी/सांबारसोबत खायला मसाला डोसा तयार! aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi
god aappe
idli
वरील पिठाच्या आपण इडलीही करू शकतो. इडलीचे पीठ थोडे घट्ट असते.पीठ फेरमेंटेशन साठी ठेवताना पाणी कमी घालणे. ७-८ तासानंतर इडली पात्राला तेल लावून त्यात पीठ घालून इडली १५ मिनिटांसाठी वाफेवर शिजवणे.चटणीबरोबर सर्व्ह करणे.
रवा डोसा/रवा आंबोळी
साहित्य:
- १ वाटी उडीद डाळ
- २ वाट्या रवा
- मीठ चवीनुसार
- २ ग्लास पाणी
कृती:
प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घाला. २-३ तासानंतर ती मिक्सरमधून वाटून घ्या. वाटलेल्या डाळीत रवा, मीठ व पाणी घालून मिश्रण फेरमेन्ट व्हायला ७-८ तास ठेवून द्या. ७-८ तासानंतर नॉन स्टिक तवा/ बिडे घ्या. गॅसवर मध्यम आचेवर तव्यावर डोसे घाला. डोसे घालताना consistency चेक करा. आवश्यकता असल्यास पाणी घाला.दोन्ही बाजूनी डोसा खरपूस भाजून घ्या. रवा डोसे चटणीबरोबर सर्व्ह करा.
हा रवा डोसा अगदी कमी साहित्यात बनतो व चवीलाही छान लागतो. वालाच्या उसळीबरोबर हा आपण जेवतानाही खाऊ शकतो. "aamboli/sada dosa/masala dosa/tikhat aappe/god aappe/idli recipe marathi"
Comments
Post a Comment