गणिताची गोष्ट Maths Story for children-Daily Life maths

Maths Story for children-Daily Life maths

Maths Story for children-Daily Life maths
Maths Story for children-Daily Life maths

गणिताची गोष्ट 

Maths Story for children-Daily Life maths

 फ्रेंड्स, मी आज तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करणार आहे. 

ही गोष्ट दूरदर्शनवर बालचित्रवाणी या मालिकेतली आहे. आम्ही लहान असताना रोज सकाळी दूरदर्शनवर लहान मुलांसाठी बालचित्रवाणी ही मालिका लागायची. आमची शाळा दुपारची असल्यामुळे ती मालिका आम्ही रोज न चुकता पाहायचो. मी तुम्हाला सांगणार आहे त्यातलीच सुलू या मुलीची गोष्ट. 

सुलू ही एका गावात राहणारी गोड, गोंडस, छोटीशी मुलगी होती. तिला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही. ती शाळेत गणिताचा अभ्यास करायला कंटाळायची. घरीही तिला गणिताचा विषय काढलेला आवडायचा नाही. एकदा ती गणिताला कंटाळून राजाकडे जाते आणि त्याला सांगते की मला गणित हा विषय आवडत नाही. तर यावर काही उपाय आहे का? राजा अत्यंत हुशार आणि धोरणी असल्यामुळे तो राज्यात दवंडी पिटवतो की, "आजपासून सुलूच्या आयुष्यातून गणित हा विषय काढून टाकण्यात आला आहे. कोणीही सुलू बरोबर किंवा सुलूने कोणाबरोबरही गणिताविषयी बोलायचे नाही. जर असे झाले तर त्याला शिक्षा सुनावण्यात येईल."

 सुलू हे ऐकून खूप आनंदी होते . नाचत, बागडत घरी येते. घरीही सगळ्यांना सांगते की आजपासून माझ्या बरोबर कोणीही गणितात बोलायचे नाही. सुलूला लागलेली असते भूक. ती आईला म्हणते, "आई, मला जेवण वाढ. जेवणात मला दोन पोळ्या दे आणि थोडीशी भाजी दे." आई म्हणजे कीं, "नाहीं, सुलू गणितात बोलायचे नाही. तू दोन पोळ्या मागितल्यास, दोन म्हणजे गणित. मी तुला नाही देऊ शकत." मग सुलू  खट्टू होते आणि घराबाहेर येते. घरापाशी असलेल्या दुकानात जाते आणि दुकानदाराला सांगते, " मला एक बिस्कीटचा पुडा द्या." दुकानदार म्हणतो, १ हा तर गणिताचा आकडा आहे. मी तुला नाही देऊ शकत." त्यानंतर सुलूला फुगेवाला दिसतो. ती त्याला लंबगोलाकार फुगा द्यायला सांगते. पण फुगेवाला बोलतो कि "हा पण गणितामधलाच आकार आहे. मी नाही देऊ शकत." मग सुलु मित्र-मैत्रीणीसोबत खेळायला जाते. पणन तिथेही तेच. मुले म्हणतात, आमच्याबरोबर गणितात बोलू नकोस. 

सुलुला समाजते कि गणित हा तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तो आयुष्यातून काढल्यावर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ उरणार नाही. सुलुला आपली चूक समजते, ती राजाकडे जाते आणि त्याची माफी मागून सांगते की, "मला माझी चूक समजली. आज पासून मी गणिताचा रोज अभ्यास करेन. गणिताला कधीच कंटाळणार नाही."

Daily Life maths

या ब्लॉगमध्ये, गणिताचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडतो याची २० व्यावहारिक उदाहरणे आपण पाहू.

  1. स्वयंपाक: रेसिपीचे प्रमाण, स्वयंपाकाच्या वेळा ठरवणे.
  2. बजेटिंग: खर्चाचा मागोवा घेणे, बचत करणे.
  3. वेळ व्यवस्थापन: कार्य कालावधीचा अंदाज लावणे,  Activities शेड्यूल करणे.
  4. खरेदी: सवलती, किमतींची तुलना करणे.
  5. घर सुधारणा: फर्निचरसाठी जागा मोजणे, नूतनीकरणासाठी बजेट tayar karne.
  6. वाहतूक: अंतर मोजणे, इंधनाचा वापर, प्रवासाच्या वेळेचा अंदाज लावणे.
  7. बागकाम: बागेची क्षेत्रे मोजणे आणि खतांचे प्रमाण मोजणे.
  8. आरोग्य: कॅलरीच्या सेवनाचा मागोवा घेणे, बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणे आणि व्यायामाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे.
  9. खेळ: गुण मोजणे.     'Maths Story for children-Daily Life maths'
  10. प्रवासाचे नियोजन: सहलींचे बजेट, टाइम झोनमधील फरकांची गणना करणे.
  11. मासिक बिले: वीज, पाणी आणि इंटरनेट वापराची गणना करणे.
  12. होम ऑर्गनायझेशन: स्टोरेज स्पेस वाढवणे, शेल्फ क्षमतेची गणना करणे.
  13. कर्जाची परतफेड: मासिक हप्ते, व्याजदर आणि कर्जाच्या कालावधीची गणना करणे.
  14. मेजवानी नियोजन: अन्न आणि पेय पदार्थांच्या प्रमाणात अंदाज लावणे, पाहुण्यांच्या आसन व्यवस्थेची गणना करणे आणि पार्टीच्या खर्चासाठी अंदाजपत्रक करणे.
  15. बँकिंग: व्याज मोजणे, खात्यातील शिल्लक ट्रॅक करणे आणि बचत व्यवस्थापित करणे.
  16. बिल स्प्लिटिंग: मित्रांमध्ये समान रीतीने बिले विभागणे किंवा वैयक्तिक शेअर्सची गणना करणे.
  17. विमा: कव्हरेज मर्यादा समजून घेणे, प्रीमियमची गणना करणे आणि पॉलिसी पर्यायांची तुलना करणे.
  18. वेतनपट: वेतन, कपात आणि ओव्हरटाइम वेतन मोजणे.   Maths Story for children-Daily Life maths
  19. कॅलेंडर आणि तारखा: तारखांमधील दिवसांची गणना करणे, भविष्यातील किंवा मागील तारखा बघणे.
  20. लेबले वाचणे: उत्पादनाचे लेबल वाचून पौष्टिक माहितीचा अर्थ लावणे.

maths

दैनंदिन जीवनात गणित महत्त्वपूर्ण आहे. त्याचा व्यावहारिक उपयोग आपल्याला दैनंदिन दिनचर्येतील गुंतागुंत कार्यक्षमतेने आणि आत्मविश्वासाने सोडवण्यास सक्षम करतो.  "Maths Story for children-Daily Life maths"

Comments

Popular posts from this blog

pravasachi purvtayariप्रवासाची पूर्वतयारी travel preparation in marathi

स्वतःची काळजी घ्या self-care in marathi

घर कसे स्वच्छ करावेhow to clean home step by step in marathi