पुरणपोळी व कटाची आमटी puranpoli and katachi aamti recipe in marathi
puranpoli and katachi aamti recipe in marathi
पुरणपोळी, ज्याला होलीज किंवा ओबट्टू असेही म्हटले जाते, हा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि भारताच्या इतर भागांतील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. हि पोळी शिजवलेली मैदा, चणा डाळ, गूळ, वेलची पूड, जायफळ पूड इ. मिश्रण वापरून बनवले जाते.
महाराष्ट्रात सणासुदीला आवर्जून हा पदार्थ बनवला जातो. पोळीचा तुपासोबत तोंडात विरघळणारा घास घेतल्यावर स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद होतो.
puranpoli and katachi aamti recipe in marathi
पुरणपोळी
puranpoli
साहित्य:
- १ वाटी चणा डाळ
- १ वाटी गूळ
- १/२ चमचा वेलची पूड
- १/२ चमचा जायफळ पूड
- १/४ चमचा हळद
- ३ वाट्या मैदा/ गहूपीठ
- १/४ वाटी तूप
- १/४ वाटी तेल 'puranpoli and katachi aamti recipe in marathi'
- मीठ
- पाणी
puranpoli
कृती:पुरण
तयार करायची कृती:
प्रथम
डाळ स्वच्छ धुवून घ्या. कूकरमध्ये एक भांड्यात ३
ग्लास पाणी घालून डाळ
६-७ शिट्या करून
शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर
डाळीतले पाणी गाळून घ्या.
ह्याच पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
गॅसवर मध्यम आचेवर एका कढईत गाळलेली
डाळ, गूळ, वेलचीपूड, जायफळपूड
घालून शिजवून, घोटून घ्या. जोपर्यंत त्या मिश्रणात उलाथने
सरळ उभे राहत नाही
तोपर्यंत ढवळत राहा. नंतर
गॅस बंद करून मिश्रण
थोडे गरम असतानाच पुरणयंत्र/
मिक्सर/ पुरणचाळणी वर बारीक वाटून
घ्या. puranpoli and katachi aamti recipe in marathi
एक परातीत पीठ, मीठ, हळद,
पाणी,घालून गोळा तयार करा.
त्यात १/४ वाटी
तेल घालून पीठ तिंबून घ्या.
तेल चांगले पिठाच्या गोळ्यात मुरले जाईल. तेल
घालून पीठ तिंबल्याने पुरणपोळी
खुसखुशीत होते.
पुरणपोळी
बनवण्याची कृती:
मध्यम
आकाराचे पिठाचे व पुरणाचे गोळे
बनवून घ्या. पिठाच्या एका गोळ्यात एक
पुरणपोळीचा गोळा ठेवून उंढा
बंद करा. पोळपाटावर एखादा
पेपर घालून त्यावर तांदळाची पिठी/ पीठ लावून पोळी
हलक्या हाताने लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही
बाजूनी तूप सोडून पोळी
खरपूस भाजा. गरमागरम पुरणपोळी खाण्यास तयार!
katachi aamti
- ४ चमचे शिजवलेली चणा डाळ
- १/२ वाटी किसलेले ओले खोबरे
- १/२ कांदा
- ७-८ लसूण पाकळ्या
- १ चमचा तीळ
- १/४ चमचा गरम मसाला
- १/२ चमचा लाल तिखट
- १/४ चमचा हळद
- ६-७ कढीपत्ता पाने
- १/२ चमचा साखर/गूळ
- १/४ चमचा राई
- १/४ चमचा जिरे
- थोडी kothimbir
- मीठ
- २ चमचे तेल
- १/४ चमचा हिंग
- १ कोकम
- पाणी
प्रथम
चणा डाळ पाणी घालून
कूकरमध्ये ३-४ शिट्यांमध्ये
शिजवून घ्यावी/तयार पुरण असेल
तर तेच घ्यावे.
वाटणाची कृती:
गॅसवर
मध्यम आचेवर एका कढईत १
चमचा तेल घालून त्यावर
३-४ लसूण पाकळ्या,
तीळ, कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात ओले
खोबरे घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात
गरम मसाला , थोडे पाणी घालून
मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करावे.
आमटीची कृती:
गॅसवर मध्यम
आचेवर एका टोपात तेल
घालून त्यात राई, जिरे घाला.
ते तड्तडल्यानंतर हिंग, हळद, ठेचलेल्या लसूण
पाकळ्या, कढीपत्ता घालून फोडणी तयार करावी. त्यात
घोटलेली चणा डाळ/ पुरण,
त्याचे पाणी(कट), तयार
वाटण, लाल तिखट, कोकम,
गूळ, मीठ घालावे. आमटीला
चांगली उकळ येऊ द्यावी.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमगरम आमटी पुरणपोळीबरोबर सर्व्ह
करा.
सण, विशेष प्रसंग किंवा वर्षभरात कोणत्याही वेळी पुरणपोळीचा आनंद लुटला जात असला तरी पुरणपोळी एक लाडके मिष्टान्न आहे जे सर्वाना आनंद देते.
"puranpoli and katachi aamti recipe in marathi"
Comments
Post a Comment