पारंपरिक मालवणी/कोकणी पदार्थ खापरोळी/रसपोळीmalvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi

malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi

पारंपरिक मालवणी/कोकणी पदार्थ:

कोकणात नारळ मुबलक प्रमाणात असल्याने नारळाच्या विविध पाककृती आपल्याला तिथे पाहावयास मिळतात.

खापरोळी/रसपोळी 

हा कोकणातील एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. हा पदार्थ न्याहारीला खाल्ला जातो.

साहित्य:

  • 1 वाटी उडीद डाळ
  • 2 1/2 वाट्या तांदूळ
  • 2 चमचे चणा डाळ
  • 1/4 चमचा मेथी
  • 1 चमचा धने
  • 1/2 चमचा बडीशेप          'malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi'
  • मीठ आवश्यकतेनुसार 
  • 2 ग्लास पाणी
  • १/२ चमचा हळद 
  • १ ओला नारळ 
  • १ वाटी गूळ 
  • १/२ वाटी साखर 
  • १/२ चमचा वेलची पूड
  • १/२ चमचा जिरे 

 khaproli/raspoli

पोळी करण्याची कृती:

प्रथम उडीद डाळ,चणा डाळ व तांदूळ वेगवेगळे भिजत घालणे. 2-3 तासानंतर ते सर्व मिक्सरमधून वाटून घेणे. चणा डाळही चांगली बारीक वाटून घेणे कारण ती वाटायला वेळ लागतो. उडीद डाळ, तांदूळ पटकन वाटले जातात.  malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi

तव्यावर मेथी, धने, बडीशेप एकत्र खमंग वास येईपर्यंत सुकेच भाजून घेणे. थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून बारीक पूड करून घेणे. ही पूड डाळ-तांदळाच्या वाटलेल्या मिश्रणात घालणे. त्यात मीठ, हळद व पाणी घालून पीठ फेरमेन्ट व्हायला ७-८ तास ठेवून देणे. 

७-८ तासानंतर पोळी करण्यासाठी नॉन स्टिक तवा अथवा बिड्यावर १ पळी मिश्रण टाकून ते पसरवून घेणे. पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणे.

raspoli recipe 

रस बनवण्याची कृती:

नारळाचा रस काढण्यासाठी एक नारळ किसून खोबरे १/२ ग्लास पाणी घालून मिक्सरला लावून घेणे. गाळणीवर मिश्रण काढून गाळून घेणे. पुन्हा हीच क्रिया २ वेळा करावी लागेल. तोच नारळाचा चोथा परत पाणी घालून मिक्सरवर फिरवून गाळून घेणे.

काढलेल्या रसात गूळ, थोडी साखर,वेलची पूड, हळद, जिरे घालून फक्त ५ मिनिटे मंद आचेवर गरम करून घेणे. उकळी काढू नये कारण उकळी काढल्यावर रस फुटतो.

फक्त गुळाने रस तेवढा गोड होत नाही त्यामुळे थोडी साखर घालावीच लागते.

एका डिशमध्ये गरम पोळीवर नारळाचा रस घालून रसपोळी सर्व्ह करणे. 

सोलकढी

नारळाच्या दुधाची समृद्धता आणि कोकमच्या तिखटपणाची सांगड घालणारी सोलकढी त्याच्या वेगळ्या चवीसाठी ओळखली जाते. याचा कूलिंग इफेक्ट असतो आणि अनेकदा उन्हाळ्याच्या महिन्यांत उष्णतेवर मात करण्यासाठी वापरली जाते. सोलकढी त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि असे मानले जाते की त्यात औषधी गुणधर्म आहेत जे पचन सुधारण्यास, आम्लता कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकतात. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये, सोलकढी ही सामान्यतः जेवणानंतर जिरवणी म्हणून दिली जाते, 
फ्रेंड्स आज आपण सोलकढी कशी बनवायची ते शिकूया. 

साहित्य:

  • १ ओला नारळ
  • २ चमचे कोकम आगळ 
  • १/२ बीट
  • ३-४ लसूण पाकळ्या
  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ मिरची
  • १/२ चमचा साखर
  • मीठ आवश्यकतेनुसार               

 कृती:

लसूण व मिरची गॅसवर भाजून घ्यावी. सोलकढीसाठी नारळाचा रस काढणे. ओला नारळ किसून मिक्सरवर पाणी घालून वाटून घेणे. वाटताना त्यात बीट, भाजून घेतलेली लसूण व मिरची घालणे. गाळणीवर रस घालून घेणे. हीच क्रिया २ वेळा करणे. नारळाच्या रसात आगळ, मीठ, साखर व कोथिंबीर घालणे.

 *सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी बीट घालावा. बीटाने रंग सुरेख येतो. खायचा रंग घालण्याची गरज पडत नाही.

*लसूण व मिरची भाजून घेतल्याने चव सुंदर येते.

*आगळ नसेल तर ८-१० कोकमे १ पेला पाण्यात  १/२ तास भिजल्यानंतर ती त्यात कुस्करून घ्या व ते पाणी गाळून

 वापरा.   

सोलकढीसाठी जाड नारळाचे दुधच वापरा नाहीतर कढी चविष्ट लागणार नाही.

*तुम्ही आजकाल बाजारात मिळणारे रेडिमेड कॅन नारळाचे दूधही वापरू शकता. 

सोलकढी पचनास उत्तम, पित्तनाशक व उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी जेवणानंतर प्यायली जाते. कोकण थाळीत व्हेज, नॉनव्हेज जेवणात सोलकढी आवर्जून दिली जाते. 

कांदा-खोबऱ्याचे वाटण 

कांदा खोबऱ्याचे वाटणं म्हणजे कांदा खोबरे भाजून केलेली पेस्ट. व्हेज-नॉन व्हेज पदार्थांमध्ये हे वाटणं घालता येते.या वाटणामुळे रस्याला दाटसरपणा येतो. कोकणात खोबरे जास्त असल्याने तेथील बहुतेक आमटी व भाज्यांमध्ये हे वाटणं वापरले जाते. 

साहित्य:

  • १ वाटी सुके खोबरे
  • २ वाट्या ओले खोबरे
  • ३ मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे                      
  • २ चमचे धने
  • १ चमचा तीळ
  • ७-८ काळीमिरी
  • २-३ लवंग
  • १ इंच दालचिनी
  • १ चमचा बडीशेप
  • १ मसाला वेलची
  • १/२ इंच आले
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • १ चक्रीफूल
  • १ चमचा जिरे
  • २-३ तमालपत्र
  • थोडी कोथिंबीर                                   
  • ३ चमचे तेल
  • पाणी

कृती:

प्रथम गॅसवर मध्यम आचेवर एका कढईत तेल गरम करून घेणे. त्यात वरील सर्व खडा मसाला टाकणे. तो भाजल्यावर त्यात कांदा घालणे. कांदा गुलाबी-लालसर होईपर्यंत भाजणे. नंतर त्यात ओले खोबरे घालून भाजणे. शेवटी सुके खोबरे घालून मिश्रण भाजून गॅस बंद करणे. थंड झाल्यावर थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटण बारीक वाटून घेणे. हे वाटण फ्रिजरमधे ८ दिवस टिकते. वापरायच्या आधी १ तास वाटणंचा डबा फ्रिजरमधून  बाहेर काढून ठेवणे. कुठल्याही रस्सा भाजीत/चिकन/मटण मध्ये हे वाटणं वापरता येते. वाटणं घाल्यावर ते तेल सुटेपर्यंत भाजणे त्यामुळे चव छान येते.    
"malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi