कुटुंबासाठी काही टिप्स tips to maintain strong bond in family in marathi

 tips to maintain strong bond in family

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

tips to maintain strong bond in family in marathi
tips to maintain strong bond in family in marathi
कुटुंबासाठी काही टिप्स 

 कुटुंब म्हणजे एकमेकांप्रती प्रेम, जिव्हाळा,आपुलकी. भारतात पूर्वीपासून एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. परंतु आजकालच्या आधुनिक जगात विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत चालली आहे. 

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी, आजोबा, आत्या, काका, काकी, त्यांची मुले वगैरे एकत्र राहत असत. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये एका घरात फक्त विवाहित जोडपे व त्यांची मुले राहतात.

tips to maintain strong bond in family in marathi

कुटुंबात आपापसातील नातेसंबंध दृढ होण्यासाठी काही टिप्स:

१. एकत्र या. कुटुंबामध्ये परंपरा, चालीरीति, सण-समारंभ एकत्रितरीत्या साजरे केल्यामुळे परस्परांमध्ये प्रेम, जिव्हाळ्याची वृद्धि होते. आपलेपणाची भावना वाढीस लागते. 

tips to maintain strong bond

२. वेळ द्या. मनुष्य आजकाल धकाधकीच्या जीवन चक्रात अडकत चालला आहे.  प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतो त्यामुळे कुटूंबाला हवा तेवढा वेळ देता येत नाही. परंतु, शक्य असेल तेव्हा सर्वानी एकमेकांबरोबर कमी का होईना पण गुणवत्तापूर्ण वेळ घालवावयास हवा. घरी आल्यानंतर आपल्या प्रियजनांशी साधलेल्या संवादामुळे, एकत्रित घालवलेल्या क्षणांमुळे मनावरचे ओझे हलके होते. दिवसभराचा ताण, क्षीण, थकवा नाहीसा होतो. एकमेकांमधील बॉण्डिंग सुधारते. 

'tips to maintain strong bond in family in marathi'

३. कृतज्ञता व्यक्त करा. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे कौतुक केले पाहिजे. एकमेकांप्रती असलेल्या प्रेम, समर्पण, त्याग इ. बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ही गोष्ट केवळ वैयक्तिक समाधानच देत नाही, तर कुटुंबात सकारात्मकताही निर्माण करते. 

tips to maintain strong bond in family in marathi

४. संवाद साधा. कुटुंबात दोन पिढय़ांमध्ये परस्पर सामंजस्य असणे आवश्यक आहे. एकमेकांमधील संभाषण दोन पिढय़ांमधील अंतर कमी करण्याचे काम करते. कुटुंबात समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या व आपल्याही भावना निसंकोचपणे मांडा.

५. आधार द्या.  कुटुंब पाठीशी असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या कुठलाही आधारची गरज भासत नाही. कोणत्याही प्रसंगी खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हा कुटुंबाचा पाया होय.

६. सहल आयोजित करा. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने सहलीस जायला हवे. सहलीमुळे एकमेकांमधील नाते दृढ होण्यास मदत होते, समजूतदारपणा वाढतो व एकजुटीची भावना निर्माण होते. 

tips to maintain strong bond

७. स्वातंत्र्य द्या. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मताचा आदर करा. त्याला आपापले छन्द, आवडी इ. जपण्याची मुभा द्या. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास त्यांना मदत करा.

८. माफ करा. कोणाकडून काही चूक झाली तर त्यांना माफ करा व ती चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगा. चुकीतून काहीतरी शिकण्यास मिळतेच याची जाणीव करून द्या.

९. हसते-खेळते  वातावरण ठेवा. घरात नेहमी आनंदी वातावरण राहू द्या. घरातील सर्वाना छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधायला शिकवा.

१०. प्राधान्य द्या. सर्वात आधी कुटुंबाला, नात्यांना, त्यातील जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्या.

कुटुंब ही देवाने दिलेली अनमोल देणगी आहे ती जपा.

"tips to maintain strong bond in family in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

साफसफाईसाठी कालबाह्य झालेली उत्पादने use of certain expired products for cleaning