नानकटाई nankatai receipe in marathi
नानकटाई nankatai receipe in marathi
आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे!
nankatai receipe in marathi |
नानकटाई
नानकटाई हा एक बिस्किटचा प्रकार आहे जो आपण चहाबरोबर खाऊ शकतो. दिवाळसणामध्ये मिठाईचा एक पदार्थ म्हणूनही हा बनवला जातो.
साहित्य:
- ३०० ग्राम पिठीसाखर
- ३०० ग्राम डालडा
- ६०० ग्राम मैदा
- १ चमचा बेसन
- २ थेम्ब इसेन्स
कृती:
परातीत प्रथम डालडा फेसून घेणे. १० मिनिटे फेसल्यानंतर डालडा हलका होतो. नंतर त्यात पिठीसाखर घालून पुन्हा चांगले फेसणे. त्या मिश्रणात मैदा व बेसन(हवे असल्यास इसेन्स) घालून मिक्स करणे. त्याचा एक सैलसर पिठाचा गोळा तयार होईल. त्याचे छोटे-छोटे लिंबाएवढे गोळे करणे व बेकरीत नानकटाई भाजण्यास देणे. सोनेरी-गुलाबी रंगावर भाजलेली खुसखुशीत नानकटाई खाण्यास तयार!
Comments
Post a Comment