लहानपणीच्या आठवणी lahanpanichya aathvani lahanpan dega deva
lahanpanichya aathvani lahanpan dega deva
lahanpanichya aathvani lahanpan dega deva |
Lahanpanichya Aathvani lahanpan Dega Deva
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवाआज एवढे मोठे झाल्यानंतरही लहानपणीच्या आठवणीत रमायला होते. अजूनही मन लहानपणातच रुंजी घालते. आठवणी बऱ्याच आहेत पण किती आणि कोणत्या सांगू?
दूरदर्शनवर लागणारे कार्यक्रम:
हीमॅन, व्योमकेश बक्षी, ये भी हो सकता है, रामायण, महाभारत,आठवड्यातून एकदा हिंदी, मराठी चित्रपट. सर्कस, फौजी, नुक्कड, रंगोली, छायागीत, चित्रहार, मालगुडी डेज, गजरा, तेनाली रामा, चंद्रकांता, अलिफ लैला, देख भाई देख, मुंगेरीलाल के हसीन सपने, वागले की दुनिया, ॲलिस इन वंडरलॅन्ड, लॉरेल अँड हार्डी, किले का रहस्य, गोट्या, ३१ डिसेंबर च्या रात्री लागणारे मराठी कार्यक्रम.
शाळेच्या बाहेरील दुकानात मिळणारे गोड बडीशेप, चिंचा, बोरे.
खेळले जाणारे खेळ:
आट्यापाट्या, कांदा-चिरी, खांब-खांब, भोवरा, काचा-काचा, सापशिडी, कॅरम, फुल्ली का गोळा, नाव-गाव-फळ-फूल, रंग-रंग कोणता, नवा व्यापार, रंगीबेरंगी गोट्या, पत्ते( ५-३-२, गाढव-गाढव, गुलाम चोर).
बाहेर फिरायला जाताना, जत्रेत जाताना, नवीन कपडे मिळाले कि होणार आनंद गगनातही मावत नसे.
घरून शाळेच्या डब्यात मिळणाऱ्या साखर चपातीचा गोडवा आज कशालाच नाही.
घरात टीव्ही असतानाही शेजाऱ्यांकडे जाऊन टीव्ही बघणे, उन्हाळी सुट्टीत नातेवाईकांकडे राहायला जाणे, दिवाळीच्या सुट्टीत मित्र/मॆत्रिणीसोबत धमाल मौज-मजा करणे,आईच्या,आजीच्या कुशीत झोपणे, यात वेगळेच सुख होते. गावावरून निघताना चेहऱ्यावरून फिरवलेल्या आजीच्या सुरकुतलेल्या हातांचा स्पर्श आजही जाणवतो.
मोठी माणसे आपल्यावर रागवायची तेव्हा राग यायचा,आपण कधी एकदा मोठे होणार असे वाटायचे पण आता त्यांच्या रागावण्यातली काळजी समजते व आपण लहानच राहिलो असतो तर किती बरे झाले असते असे वाटते.
Comments
Post a Comment