भावनिक बुद्धिमत्ता (EI) सुधारा Develop Emotional Intelligence
Develop Emotional Intelligence
आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे!
अनेकदा यशाचे मोजमाप अनेकदा IQ आणि टेक्निकल स्किल्सनी केले जाते, परंतु एक दुर्लक्षित घटक आहे जो आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता- EI (इमोशनल इंटेलिजन्स).
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावनांना ओळखणे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या भावना समजून घेऊन व्यवस्थापित करण्याची क्षमता तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची आणि सहानुभूती दाखवण्याची क्षमता. यामध्ये भावनांची जाणीव असणे, प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि इतरांशी प्रभावीपणे संवाद साधणे समाविष्ट आहे.
या ब्लॉगमध्ये आपण EI विकसित केल्याने जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश कसे मिळू शकते याचा शोध घेऊ.
Develop Emotional Intelligence |
Develop Emotional Intelligence
इमोशनल इंटेलिजन्स आपल्या जीवनात किती महत्त्वाचा असतो हे सांगणारी ही गोष्ट वाचा.
रश्मी नावाची एक महिला तिच्या रेखा नावाच्या मैत्रिणीला भेटायला एकदा कॉफी शॉपमध्ये गेली. तिथे रश्मीला समजले की रेखाच्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स, संघर्ष सुरू आहे. रश्मीने रेखाचे म्हणणे पूर्ण लक्ष देऊन ऐकले, समजून घेतले. रेखा निराश झाली आहे हे पाहून रश्मीने तिला सहानुभूती दाखवली. तिला आपला पाठिंबा असल्याचेही दर्शवले आणि प्रोत्साहन देखील दिले. यामुळे. यामुळे त्या दोघांची मैत्री अधिकच दृढ झाली. रश्मीच्या अशा वागण्याने रेखाला भावनिक आधार मिळाला होता. 'Develop Emotional Intelligence'
त्या दिवशी नंतर रश्मीलाही तिच्या कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. बॉस राजेश रश्मीच्या एका टीम प्रोजेक्टमधील कामाबद्दल नाखूष होता. रश्मीने त्रागा ना करता त्याच्याशी सकारात्मक संवाद साधत त्याला काय अपेक्षित आहे हे समजून घेतले. आपल्या कामातील चुका मान्य करत तिने त्या सुधारण्याचे मान्य केले. परंतु, विचारमंथन करताना तिच्या टीम मेम्बर्सच्या भिन्न मतांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला. रश्मीने परिस्थिती निवळण्यासाठी प्रत्यत्न केला. मुक्त संवादाला प्रोत्साहन दिले, प्रत्येक सदस्याचा दृष्टीकोन शांतपणे ऐकला. आदर आणि समजूतदारपणाची दाखवून रश्मीने कामाचे वातावरण अधिक सुसंगत आणि उत्पादक बनवले.
संध्याकाळी, रश्मी एका समारंभाला गेली जिथे तिला अनेक नवीन लोक भेटले. तिने तेथील लोकांच्या देहबोलीचे बारकाईने निरीक्षण केले, संवाद साधून तिला त्यांच्या भावना समजून घेता आल्या त्यामुळे ती कोणालाही परकी वाटली नाही.
२-३ दिवसानंतर रश्मीच्या पतीची नोकरी गेली. निराश असूनही तिने तिच्या भावना व्यवस्थितपणे हाताळल्या. तिने परिस्थितीचा सकारात्मक विचार केला. पतीला समजावले, त्याला त्याच्या भूतकाळातील यशांची आठवण करून दिली. त्याला सांगितले कि," काही हरकत नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे, नवीन कौशल्ये आत्मसात कर आणि भविष्यात नवीन व यापेक्षाही चांगली संधी मिळवण्यावर लक्ष केंद्रित कर." रश्मीने पतीला या धक्क्याकडे शिकण्याची आणि वाढण्याची संधी म्हणून पाहायला शिकवले ज्यामुळे त्याचीही प्रेरणा वाढली.
मुलगी रिया जेव्हा परीक्षेतील अपयशाने खचून गेली तेव्हाही रश्मीने तिला मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. "निराश न होता, खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न कर, यश तुझेच असेल", असे समजावले. Develop Emotional Intelligence
कथा जसजशी उलगडत गेली, तसतसे हे स्पष्ट झाले की रोजच्या जीवनात रश्मीच्या भावनिक बुद्धिमत्तेने महत्त्वाची भूमिका बजावली. तिला प्रभावीपणे संवाद साधणे, सुदृढ नातेसंबंध निर्माण करणे, सहानुभूती दाखविणे, संघर्षाच्या काळात स्वतःला स्टेबल ठेवणे, माहितीपूर्ण निर्णय घेणे, सहकाऱ्याला पाठिंबा देणे, संघातील संघर्षांमध्ये मध्यस्थी करणे, भावनिक आधार देणे, इ.साठी सक्षम केले.
Emotional Intelligence
भावनिक बुद्धिमत्ता (EI) विकसित करण्यामध्ये काही कौशल्यांचा समावेश होतो.
- जिज्ञासू राहा.
- तुमचे स्ट्रेंग्थ आणि विकनेसेस ओळखा.
- वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्हाला जसे वाटते, ते तसे का वाटते ते समजून घ्या.
- स्वतःला इतरांच्या जागी ठेवा, त्यांच्या भावना आणि दृष्टीकोनांमध्ये खरा रस दाखवा, प्रामाणिकपणे ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा
- आव्हानात्मक परिस्थितींना शांततेने प्रतिसाद द्यायला शिका,आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करा.
- चांगले नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, इतरांशी आदराने वागण्यासाठी आणि आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी संवाद कौशल्य, संघर्ष निराकरण आणि टीमवर्क क्षमता सुधारा.
- गरज असेल तेव्हा "नाही" म्हणायला शिकणे आणि स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देणे हे भावनिक संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे.
- अनुभवातून शिकण्यासाठी, इतरांकडून अभिप्राय मिळविण्यासाठी खुले रहा.
Comments
Post a Comment